भटाळा येथे महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन.... आशिया खंडातील सर्वात मोठी शिवलिंगाचे भक्त घेणार दर्शन...

भटाळा येथे महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन....

आशिया खंडातील सर्वात मोठी शिवलिंगाचे भक्त घेणार दर्शन...

वरोरा......जगदीश पेंदाम

 तालुक्यातील जवळच येत असलेल्या 18 किलोमीटर अंतरावर भटाळा सुंदर गाव आहे गावाच्या पश्चिमेस विशाल काय मोठे शिवमंदिर जे भोंडा महादेव म्हणूनही ओळखले जाते, सुमारे 15 व्या शतकातील हेमाडपंथी शिल्पकलेचे शिवमंदिर आहे त्याला शिवलिंग भोंडा महादेव म्हणून परिसरात ओळखले जाते दरवर्षी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी लाखोच्या संख्येने भाविक मनोभावे दर्शन घेतात हे मंदिर विदर्भातील एकमेव मोठे शिवलिंग व हेमाडपंथी शिल्पकलेची वास्तु असल्याचे बोलले जाते. भटाळा शिल्पग्राम अशी ओळख असलेल्या या गावात पुरातन काळापासून विविध शिल्पकलेची मंदिरे आढळून येतात यात भोंडा महादेव ,भवानी माता मंदिर व या सभोवताल असलेली पहाडावरती सीताफळाची झाडे लोकांची मने आकर्षित करतात व त्याचबरोबर आंब्याची वनराई शोभून दिसते , सतत आठवडाभर येथे जञा भरते ,   
हेमाडपंथी मंदिर ही एक स्थापत्यशैली आहे बांधलेल्या मंदिराच्या बाहेरील भिंती तारेच्या आकारात बांधलेल्या असतात त्यामुळे सूर्यप्रकाश आणि सावली आलटून पालटून येण्याचा एक मनोरंजक परिणाम दिसून येतो या शैलीत बांधलेल्या मंदिरामध्ये टेनॉन व मोटाइज जॉईनच्या तंत्राचा वापर करून दगडांना कुलूप लावून कोणत्याही तोफाचा वापर न करता ही रचना तयार करण्यात आली आहे या मंदिरात पांढरा व पिवळा दगड तसेच चुन्याचा वापर केला जातो, भोंडा महादेव मंदिराला शिखर नसल्याने शिखर विरहित मंदिर वाटते मंदिरामध्ये ६ ×६मीटर आकाराच्या गर्भगृहात मध्य स्थानी चार स्तंभाच्या मध्ये १.९ मीटर व्यासाची काळ्यापाषाणाची पिंड असून त्यावर पाषाणातील 1.1 मीटर उंचीचे विशाल शिवलिंग आहे तसेच तोंड असलेला नंदी ची मुर्ती आहे विदर्भात एवढे मोठे शिवलिंग कोठेही आढळून येत नाही. यामुळे भटाळा मंदिर प्रसिद्ध आहे,महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिरे ही वेरूळचे घृणेश्वर मंदिर ,औंढा नागनाथ मंदिर, रतनवाडी अमृतेश्वर मंदिर ,श्री मल्लिकार्जुन मंदिर दहिटणे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर, सिद्धेश्वर नागनाथ मंदिर झरी तालुका चाकूर जिल्हा लातूर, हेमाडपंथी मंदिर महादेव मंदिर साकेगाव तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा,या ठिकाणी मंदिरे पहावयास मिळते.भटाळा येथील मंदिराची प्रचिती मध्ये प्रदेशातील ग्वालियर येथील मंदिर सारखे दिसते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!