धोबी समाजाचे व सत्संग भजन मंडळ यांचे वतीने कन्हाळगाव येथे "वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा" जयंती संपन्न .

धोबी समाजाचे व सत्संग भजन मंडळ   यांचे वतीने कन्हाळगाव येथे "वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा"  जयंती संपन्न .
तळोधी बा. :- 
नागभीड तालुका धोबी ,वरठी ,परीट  समाज  , व स्थानिक सत्संग भजन मंडळ यांचे वतीने कन्हाळगाव  येथे  वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 
नागभीड तालुक्यातील  कन्हाळगावं येथे     वरठी , परीट, धोबी  सेवा मंडळ  तालुका नागभिड  व  सत्संग भजन मंडळ कन्हाळगाव तर्फे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे  कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम स्थानिक गाडगेबाबा चौकातील गाडगेबाबा मंदिराचे  सुशोभीकरण करण्यात आले त्यानंतर सकाळी   समाजाचे वतीने व स्थानिक  सतत  सामाजिक कार्यात उत्स्फूर्त भाग घेणारे 'सत्संग'  भजन मंडळ   यांचे माध्यमातून येथील सरपंच रमेश घुगुसकार,   समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत श्रीकोंडवार  यांचे शुभ हस्ते  माल्यार्पण करून करण्यात आले . शेवटी सत्संग भजन मंडळ यांचे वतीने गोपालकाला करण्यात आला यावेळी  रमेश घुगुसकर सरपंच, लीलाधर बोरकर उपसरपंच, मोरेश्वर मुंगमोडे  पेंटर  ,  गणपत सहारे सामाजिक कार्यकर्ते ,  सत्संग मंडळाचे युवराज मेश्राम, अंबादास कोसरे, दिलीप कोसरे ,प्रकाश कोसरे, सुभाष कोसरे, जगदीश कोडापे, संजय कोडापे, देविदास सामुसाकडे, रमेश सामुसाकडे ,व संपूर्ण भजन मंडळ  , तसेच समाजाचे जिल्हा  उपाध्यक्ष अनिल माथनकर , सोहम माथनकर ,  सुरज मेश्राम, डॉ. राजू माथनकर , भाऊजी  मशाखेत्री,दिलीप माथनकर , माणिक दहीकर, मनोज एमपलवार , शुभम वरघंटीवार  , शरद चुनारकर, लोकेश दासरवार, गुड्डू सेंद्रे , दीपा चूनारकर, आरोही माथनकर यांच्यासह आणि नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!