वैनगंगा नदीत बुडून तीन सख्या बहिणींचा मृत्यू
सावली :- चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ आंघोळीसाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहीनींचा बुडुन मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना १.३० वाजताच्या सुमारास घडली असल्याचे समजते. चंद्रपूरातील बाबुपेठ परीसरातील रहीवाशी असलेले मंडल कुटुंबीयावर शोककळा पसरलीआहे. चंद्रपूर पोलिसांनी शोध मोहीम राबवित कविता व प्रतिमा या दोघी बहिणीचा मृतदेह सायंकाळी वृत लिहिपर्यंत शोधून काढला। होता.
चंद्रपूर येथील मंडल परिवारातील सदस्य महाशिवरात्री निमित्ताने चंद्रपूर व गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीवरील नदी पात्रात आंघोळीसाठी वैनगंगा नदीच्या पुलाखाली गेले होते. आंघोळ करीत असताना प्रथमेश पाण्याचा अंदाज न आल्याने डुबकी मारत असल्याचे दिसून आले.भावाला वाचविण्यासाठी तीन सख्या बहीणी पाण्यात उतरल्या .यात आंघोळीसाठी गेलेल्या प्रतीमा प्रकाश मंडल २३, कविता प्रकाश मंडल २२, लीपीका प्रकाश मंडल १८ यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात शीरल्या. सोबत त्यांचा लहान भाऊ व काकु सुध्दा होती. हे पाचही जण बुडत असताना आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत बराच कालावधी लोटला. दरम्यान सोबत असलेल्या काकाने प्रसंगावधान राखुन एका लहान मुलाला बाहेर काढुन तात्काळ प्राथमिक उपचार केल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश मीळाले. तर सोबत असलेली महीला पाण्याच्या प्रवाहाने वाहात जातांना नदीतील दगडाचा आधार घेऊन तब्बल एक तास पर्यंत ती तीथेच होती. तालुक्यातील आपदा दलाच्या मदतीने संबंधीत महीलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पुढील तपास सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार,यांचे सह धीरज पीदुरकर, मोहन दासरवार, केवल तुरे, राहुल तुमरेटी करीत आहेत. वृत्त लीहत पर्यंत दोन बहिणीचे मृतदेह बोटींच्या सहायाने मिळाल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!