दोन वर्षापासून जलजिवनची कामे कासवगतीनेच
ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना होत नाहक आहे त्रास
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यात दोन वर्षापासून जलजीवनची कामे शेगाव मध्ये सुरू आहे मात्र काम अजुनही परिपूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ठेकेदारानी रस्त्यावरून पाण्याची पाईप टाकून रस्त्याला मधोमध खोदून ठेवला असून ठिक - ठिकाणी,गावात मुख्य रस्त्यावर सलाख,गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे दुचाकी वाहनाचे अपघात होत असून नागरिकांना दुखापत होत आहे.ठेकेदाराच्या चुकीमुळे जलजिवनची कामे न झाल्यामुळे ठिक - ठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.उन्हाळ्याची चाहूल लागली असून नागरिकांना पिण्याचे पाण्याची आवश्यकता पडत असते अजून किती दिवस पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागेल त्यांच्या मनात? उद्भवले आहे.दोन वर्षापासून लाखो रुपयाची जलजीवनची कामे शेगाव मध्ये सुरू आहे.तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शेगाव ची ओळख आहे. शेगावची लोकसंख्या दहा हजार च्या वर असून या ठिकाणी सोमवारला मोठा आठवडी बाजार भरत असून जवळपासचे 70 ते 80 गावातील नागरिक, बाजारामध्ये येत असतात परंतु या ठिकाणी नागरिकांना व दुकानदारांना वाहन पार्क करण्याकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे.या ठिकाणी मुख्य रस्ता खोदलेला असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर किराणा दुकान,कपड्याची दुकान, हार्डवेअर, जनरल दुकान, पुस्तके कृषी केंद्र, नाश्ता, जूते,फ्रुट, दुकाने,भाजीपाला, फळे दुकाने,फुलाची दुकान इतर दुकाने असून याच रस्त्यावर दवाखाना व फार्मसी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पेशंटला तसेच ग्राहकांना नेहमीच अरुंद रस्त्यामुळे वाहन पार्क करायचे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.शेगावमध्ये नेहरू विद्यालयकडे जाणारा रस्ता, तसेच गुजरी भरण्याचे ठिकाण, इंडियन बँककडे जाणारा रस्ता,या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाहतूक सुरू राहते अरूंद रस्ता ठिक - ठिकाणी खोदून असल्याने दोन्ही बाजूला वाहन उभे राहत असल्याने दुकानदारासहित ग्राहकांना, जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने या ठिकाणी ग्राहकाकरीता वाहन उभी करण्याकरीता कुठल्या प्रकारची जागा नसून ठीक ठिकाणी वाहन उभी ठेवल्या जात असते त्यामुळे तिथून येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनास अडचणी निर्माण होत असून सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वरोरा, चिमूर 353 राज्य मार्गावर दोन्ही बाजूला वाहने उभी करण्याकरीता नागरिकांना आसरा घ्यावा लागत असून काही नागरिकांना पेट्रोल पंपच्या पटांगणामध्ये पार्किंग म्हणून वाहने लावत असतात.हर घर योजनेमार्फत गावातील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने योजना आणली आहे पण ठेकेदाराच्या काम दिरंगाई आणि ग्राम पंचायत चौधरी यामुळे कामाला खूप उशीर होत आहे त्यामुळे रस्त्यावरील खोदकामाची नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे गावातील नागरिकांना त्रास होत आहे.खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे दुचाकी वाहन चालवताना अपघात होत असून सर्व नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे लवकरात लवकर ग्राम पंचायत प्रशासनाने नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी मागणी जनतेकडून सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!