बाल संगोपनच्या पैशावर संस्थांचा डल्ला - अनाथ बालक लाभार्थ्यांकडून होतेय आर्थिक लूट
बाल संगोपनच्या पैशावर संस्थांचा डल्ला - अनाथ बालक लाभार्थ्यांकडून होतेय आर्थिक लूट
सावली (विजय कोरेवार) -
अनाथ व एकल पालकांच्या मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी मदत व्हावी याकरीता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर्थिक सहाय्याची योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणी करीता तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे मात्र या संस्थेकडून प्रती माह हजार रुपयानी लाभार्थ्यांची आर्थिक लूट सुरु असल्याची चर्चा सावली तालुक्यात आहे.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०१३ नुसार, व दिनांक ३० मे २०२३ नुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त, एचआयव्ही, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी बालकांना 2250 रुपये दरमहा देण्यात येत असून सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी बालकांना जिल्हास्तरीय कार्यालयात जावे लागत होते . बालकांना गैरसोय होवू नये व सदर योजनेचा काम सुरळीत पार पाडण्याकरिता शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक जिल्हयात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या नियंत्रणात तालुक्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांचे आधार सिडींगसाठी स्वयंसेवी संस्थेची निवड करण्यात आली आहे. सावली तालुक्यात हे काम किरण फाउंडेशन चंद्रपूर या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले आहे मात्र या संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून योजनेचे लाभ मंजूर करण्यासाठी, मंजूर लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांकडून दरमहा एक हजार रुपये पैशाची मागणी होत असल्याची चर्चा आहे. लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पैसे मागण्या इतपत हिंमत करीत असल्याने योजना बंद करतील या भीतीपोटी महिलांनी पैसेही दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी झटून अनाथाना आश्रय दिले त्यांच्या नावानी संस्थेकडून अनाथाची लूट होत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
ही योजना मोफत राबवायची असून कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करू नये. तसे होत असल्यास न घाबरता महिला बाल कल्याण विभाग सावली किंवा जिल्हा महिला बालकल्याण विभाग येथे लेखी तक्रार दाखल करावी. लाभ नामंजूर करण्याचा अधिकार कोणत्याही संस्थेला नाही.
श्री. दिपक बानाईत
जिल्हा महिला बाल कल्याण विभाग चंद्रपूर
%20(4).jpeg)



स्वयंसेवी संस्था आधार सिडिंग करीत नाहीत. लाभार्थी, पालकांना स्वतः संबंधित बँकेत जाऊन आधार सिडिंग करावे लागते. सिडिंग साठी पाठपुरावा करून संस्था लाभार्थ्यांकडून आधार, पासबुकची झेरॉक्स व्हाँटसअपवर मागवून ते जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास पाठवतात. फक्त नुतनीकरणाचे काम संस्था करतात. यासाठी अशा संस्था पैसे वसूल करीत असल्यास याबाबत लेखी तक्रार संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे करून पोच घ्यावी. त्याची एक प्रत मिलिंदकुमार साळवे, समन्वयक महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनवर्सन समिती, मोबाईल :९८५०९६२५३५ यांच्याकडे पाठवावी. त्यानुसार वरिष्ठांनकडे पाठपुरावा करता येईल. व्या प्रस्तावांसाठी जिल्हा स्तरावरच जावे लागते.
उत्तर द्याहटवाOk
उत्तर द्याहटवा