शवविच्छेदन अहवालासाठी नातेवाईकांची पायपीट - सावली ग्रामीण रुग्णालयाचा प्रताप

 

सावली - आरोग्य विभाग म्हणजे तत्परतेने काम करणारी यंत्रणा म्हणून ओळख आहे. मात्र यासाठी सावली ग्रामीण रुग्णालय अपवाद ठरत आहे. शवविच्छेदन अहवालाशिवाय पुढील काम होऊ शकत नाही मात्र हा अहवाल द्यायलाच 15 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा एवढी लागत असल्याचा प्रकार अनेकदा सावली ग्रामीण रुग्णालयात येत आहे.

    सावली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांचे कारनामे नेहमीच चर्चेत असतात. 1 जानेवारी ला खेडीजवळ सत्यवान मडावी या युवकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्या 

 दाखल्यासाठी 21 दिवसाचे आत नगर पंचायतला नोंद करावी लागते. मात्र 15 दिवसाचा कालावधी होऊनही शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे प्राप्त झाला नाही. नातेवाईक पोलीस स्टेशन, रुग्णालयात चकरा मारत आहेत मात्र डॉ. देशमुख याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आलेला असल्याने रुग्णालयाच्या कामकाजाप्रती संताप व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!