चिमूर तालुक्यातील उसेगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरु

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या उसेगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरु असून महसूल प्रशासन झोपी गेल्याचे चित्र आज बघावयास मिळत आहे.ऐकेकाळी उसेगाव याठिकाणी रेती माफियांच्या विरोधार्थ मोठे आंदोलन केले जायचे कुणालाही उसेगाव येथील उमा नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करू दिले जात नव्हते गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच हे रेतीचे वाहन अडवीत होते. परंतु आज याउलट चित्र बघायला मिळत आहे. दिवस रात्र सर्रास या उसेगाव इथून रेती चोरीचा खुलेआम उपक्रम सुरु असल्याचे बघायला मिळत आहे.उपविभागीय अधिकारी असो अथवा तहसीलदार व त्यांचा महसूल पथक कुणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही म्हणून या माफियांना आशीर्वाद तरी कुणाचे अशे संभ्रम जनतेला निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!