खुनातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - मुलीच्या सासूचा केला होता खून

 

सावली - पोलिस स्टेशन सावली अंतर्गत बोथली येथील आरोपी बंडू कवडू पुल्लावार याने तीन वर्षांपूर्वी शकुंतला नंदमवार या महिलेचा खून केला होता. त्या घटनेत आरोपीला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

        आरोपीचे पत्नी वंदना व मुलगी अंकिता सोबत पटत नव्हते. तो परिवारापासून वेगळा राहत होता. दिनांक ०४/०५/२२ रोजी वंदना पुल्लावार यांची मोठी मुलगी मोनाली हिची सासू शकुंतला नंदमवार ही काही कामा निमित्त बोथली येथे मुक्कामाने आली होती . सदर दिवशी रात्री अंदाजे ११:३० वाजता दरम्यान वंदना, मुलगी अंकिता व शकुंतला नंदमवार असे झोपले असतांना आरोपी बंडू पुल्लावार ह्याने घरात प्रवेश करून स्वतःची पत्नी वंदना समजून शकुंतला नंदमवार हिच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार केले तसेच अंकिता ला सुद्धा जखमी केले. उपचारादरम्यान शकुंतला नंदमवार ही मरण पावली. फिर्यादी कु. अंकीता पुल्लावार हिचे डीडी बयानावरून पो. स्टे सावली येथे अपराध क्रमांक १०४/२२ कलम ३०७,३२५,३०२ भा द वी अन्वये गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन ठाणेदार आशिष बोरकर यांनी स्वतःकडे घेऊन आरोपीला अटक करून व तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर येथे सदर गुन्ह्याचा खटला सुरू होता. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा असल्याने सदर खटल्यात मा. श्रीमती भीष्म जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांनी आरोपी बंडू कवडू पुल्लावार ह्याला कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा तर कलम ३२५ भा. द. वी. मध्ये ३ वर्षे कारवासाची शिक्षा सुनावली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!