गुरुकुल क्लासेसचा अभिनव उपक्रम

विनामूल्य सराव नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा व बक्षिस वितरण

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१२/०१/२०२४ अशोक गिरी स्थानिक गुरुकुल (CPS)‌ क्लासेस यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना परीक्षेतील वेळेचे व्यवस्थापन व परीक्षा पद्धती लक्षात येण्यासाठी सराव प्रवेश पूर्व नवोदय विद्यालय परीक्षा विनामूल्य दि.१२ जानेवारी रोजी गुरुकुल क्लासेस पवनी येथे घेण्यात आली.सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या प्रथम क्रमांक वैनगंगा विद्यालयाची नंदिनी बावनकर, द्वितीय क्रमांक जि.प.प्रा.शाळा कोदूर्ली येथील दीपश्री सती बावणे,रेनबो शाळेची विद्यार्थिनी सेजल वैद्य या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. गुरुकुल क्लासचे संस्थापक संचालक रवी भिशीकर यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी व भावी जीवन समृद्ध व्हावे याकरिता एक दिवशीय‌ सराव नवोदय प्रवेश पूर्व परीक्षचे आयोजन करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक प्रदीप घाडगे,संचालक रवी भिसीकर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन व संयम राखून परीक्षेत यश प्राप्त करावे.आजचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देणे गरजेचे आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक रवी भिसीकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावे यासाठी विनामूल्य सराव परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत एकूण १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.तसेच पुढील नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा पर्यंत मोफत वर्ग घेण्यात येईल असे सांगितले.प्रमुख अतिथी शिक्षक प्रदीप घाडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSU चे तालुका अध्यक्ष भरत मेश्राम यांनी तर‌ आभार प्रदर्शन ठाकूरदास उरकुडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण सहकार्यानी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!