आणि मूल गावात नवभारत विद्यालय सुरू झाली!

आणि मूल गावात नवभारत विद्यालय सुरू झाली!

1940 चे नवभारत हायस्कूलचे स्नेहसम्मेलनाचे छायाचित्रात स्व. दादासाहेब कन्नमवार, डॉ. मारोतराव वैरागडे, मुख्याध्यापक  हजारे दिसत आहे

मूल तालुक्यातील सामाजीक, आर्थिक आणि राजकीय वर्तुळावर प्रभाव टाकणारी नवभारत विद्यालय मूल गावात कशी आणि कधी सुरू झाली? या विद्यालयात शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी पुढे देशाचे जबाबदार नागरीक झालेत, त्यातील काहीनी जिल्हयाचे नेतृत्व केलेत तर, अनेकांनी प्रशासकीय सेवेतही योगदान दिले.  आजही अमृत महोत्सव पूर्ण केलेल्या या शाळेचा दर्जा कायम टिकविण्यात संस्थेच्या संचालकांना यश आले आहे.  मुळात ही शाळा कशी सुरू झाली याचाही एक रंजक इतिहास आहे.

मूल शहरात 1940 पूर्वी हायस्कूल नव्हती. आताची नवभारत विद्यालय हे चंद्रपूरच्या सीटी हायस्कूल परिसरात परिसरात नवभारत सिटी हायस्कूल या नावांने ओळखली जाणारी शाळा होती.  1040 मध्ये या शाळेचे सम्मेलन चंद्रपूरात भरले होते.  या सम्मेलनात राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार, स्व. मारोतराव वैरागडे, तेव्हाचे मुख्याध्यापक हजारे उपस्थित होते.

पुढे डॉ. मारोतराव वैरागडे हे मूल नाग विदर्भ चरखा संघ येथे नौकरीच्या निमीत्ताने आलेत. त्यांची मूलचे वि.तू. नागपुरे, स्व. अन्नासाहेब सहस्त्रबुध्दे, आर. के. पाटील यांचेशी मैत्री जमली.  त्यांचे मैत्रीतूनच चंद्रपूरात सुरू असलेली नवभारत हायस्कूल मूल येथे स्थलांतरीत करण्यात आली.  ही शाळा तेव्हा ग्राम पंचायतीच्या आवारात भरत होती.   कालांतराने, आज ज्या ठिकाणी नवभारत विद्यालयाची भव्य इमारत आहे, ती जागा ओझा लक्ष्मीभाई गोगीरवार यांचेकडून खरेदी करून, तीथे या शाळेचे स्थलांतरण करण्यात आले. याच ठिकाणी, मूल रेल्वे स्टेशनचे तिकिट घर होते.  रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी येथे तिकीट काढायचे आणि जुन्या रेल्वे स्टेशनवर जावून रेल्वेनी प्रवास करायचे. 

शिक्षणाचा प्रसार अधिक वाढविण्याकरीता त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ मूल या नावाने संस्थेची नोंदणी करण्यात आली.  वि.तू.नागपूरे हे अध्यक्ष तर डॉ. मारोतराव वैरागडे हे सचिव झाले. पुढे अनेक गावात शाळा सुरू करून, ग्रामिण भागातील मुला—मुलींना शिक्षणाची दारे उघडून दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!