वाघाच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी - घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल
सावली - गुरे चारत असतांना प्रभाकर वेटे मानकापूर या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ भरती केले आहे.
तालुक्यातील मानकापूर येथील शेतकरी प्रभाकर वेटे वय 55 हे चारगाव भागातील रिंगदेव तलाव परिसरात गुरे चारत असतांना दुपारच्या सुमारास वाघाने हल्ला केला. सोबती प्रकाश जुमनाके आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला. मात्र शेतकरी गंभीर जखमी झाल्याने सावली ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरीता भरती करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरीता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे . वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लूरवार, माजी सभापती विजय कोरेवार यांनी जखमीची भेट घेतली .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!