अखेर मामाने भाचीला पक्षातून काढले!

अखेर मामाने भाचीला पक्षातून दिला डच्चू


भाचीने विधानसभेच्या निवडणुकीत केलेली बंडखोरी तीच्या अंगलट आली. भाचीची बंडखोरी मामाला आवडली नाही. आणि मामाने भाचीला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले.
ही भाची आहे बल्लारपूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे आणि मामा आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले!
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी उमेदवारी मागताना आणि बल्लारपूर मतदारसंघात प्रचार करताना आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाची असल्याचे अनेकांना सांगितले तसे माध्यमातही प्रकाशित झाले. मामाच्या ताकदीवर भाचीने काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. मात्र मामा तिला उमेदवारी मिळवून देऊ शकले नाही अखेर आपला "मामा" झाल्याचे लक्षात येतात भाचीने थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाचीच्या हट्टापुढे मामानेही तिला रिंगणातून बाहेर येण्याचा ना सल्ला दिला ना आदेश! काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे विरुद्ध बंडखोरी केल्यानंतरही नाना पटोले यांनी अभिलाषा गावतुरे यांचे निलंबन न केल्याने नाना पटोले यांचे भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे उमेदवारी मागे नाना पाटोलेचाच हात आहे, अशा बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. अखेर प्रदेश काँग्रेसचे नाना गावंडे यांनी राज्यातील 16 बंडखोर उमेदवारीची सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली. त्यात डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे नाव आहे. मामाने भाचीला पक्षातून निष्कासित केल्याची चर्चा आता मतदारात आहे.
काँग्रेसची विचारधारा न स्वीकारता केवळ उमेदवारीसाठी आणि काँग्रेसच्या मतासाठी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र मनासारखे न झाल्याने त्यांनी पक्षाशी बेईमानी केली असा आरोप आता काँग्रेस कडून केल्या जात आहे. त्या काँग्रेस पक्षात केवळ सहा महिने होते, सहा महिन्यात पक्षाचे काम करण्याऐवजी उमेदवारी मागण्यातच वेळ घालविला असाही आरोप काँग्रेस कार्यकर्त्याकडून केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!