स्वतःवर आरटीआय लावून घेणारा भारतातील पहिला लोकप्रतिनिधी कोण?
स्वतःवर आरटीआय लावून घेणारा भारतातील पहिला लोकप्रतिनिधी कोण?
प्रशासनात पारदर्शकता आली पाहिजे याकरिता देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर 2005 मध्ये देशात माहितीचा अधिकार लागू झाला. माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत देशभरातील प्रशासनाची संपूर्ण माहिती मिळविणे हा देशातील नागरिकांचा हक्क बनला. हा कायदा करताना लोकप्रतिनिधींनी मात्र स्वतःला या कायद्यापासून दूर ठेवले. आपली कोणतीही माहिती सामान्य जनतेला मागण्याचा हक्क असू नये याची तरतूद त्यांनी कायद्यात केली. त्यामुळे कुणालाही शासकीय माहिती मागवायचे असेल तर प्रशासनातील अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयाशी संबंधित माहितीच मागता येत होती. देशातील सर्व लोकप्रतिनिधी स्वतःला माहितीच्या अधिकारापासून दूर ठेवत असताना देशातील एकमेव लोकप्रतिनिधींनी मात्र स्वतः या कायद्याच्या कक्षेत येत नसतानाही, आपल्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतःवर माहितीचा अधिकार लागू करून घेतला. आपल्याला ठाऊक आहे या लोकप्रतिनिधीचे नाव काय? नाही ना! सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार !
सुधीर मुनगंटीवार, हे चंद्रपूर विधानसभेतील आमदार असताना, 2005 मध्ये देशभरात माहितीचा अधिकार लागू करण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनीही स्वतःहून माहितीचा अधिकार आपल्याला लागू करून घेतला. तशी पाटीही कार्यालया बाहेर त्यांनी लावली. नागरिकांनी मागितलेली माहिती, मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून मोफत देण्यात येऊ लागली.
एकीकडे आपली सर्व माहिती गुपित ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आटापिटा करीत असताना दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार सारखे लोकप्रतिनिधी कोणतेही बंधन नसताना स्वतःवर माहितीचा अधिकार लावून घेणे हे लोकांप्रती उत्तरदायितवांचे जिवंत उदाहरण आहे.



उत्तर द्याहटवाआपल्याला असे वाटते की आपण कदाचित काही गोंधळ करत असाल. आरटीआय म्हणजे माहितीचा अधिकार कायदा. हा कायदा सामान्य जनतेला सरकारकडून माहिती मागण्याचा अधिकार देतो.
* लोकप्रतिनिधी स्वतःवर आरटीआय लावू शकत नाहीत: कारण ते स्वतःच सरकारचा भाग असतात. ते स्वतःच्या कार्यालयाकडून माहिती मागण्यासाठी आरटीआयचा वापर करू शकतात.
* आरटीआय हा एक कायदा आहे, एखाद्या व्यक्तीवर लावण्याची गोष्ट नाही: तो सर्व नागरिकांना मिळालेला अधिकार आहे.
Mahiti dya.
उत्तर द्याहटवाPrachar Karu nka.