डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे उमेदवारीने बल्हारपूरात रंगत वाढली
डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे उमेदवारीने बल्हारपूरात रंगत वाढली
बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात ओबीसी नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे या रिंगणात कायम राहील्यांने, या मतदार संघात तिहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यांचे उमेदवारीने बल्हारपूरात रंगत वाढली आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे उमेदवारीने मतदारांना 2019 चा फिल येत असून, त्या निवडणूकीत कॉंग्रेसचे विश्वास झाडे यांचे विरोधात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत असतांना, वंचितचे राजु झोडे यांनी तगडे आव्हान उभे केले होते. त्या तिरंगी लढतील भाजपाचे सुधीर मुनगंटीवार विजयी झालेत.
2024 मध्ये कॉंग्रेसचे संतोष रावत विरोधात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचेत थेट लढत होणार असे दिसत असतांनाच, मागील अनेक वर्षापासून, या भागात आमदारकीची तयारी करणारे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी उमेदवारी कायम ठेवण्यांचा निर्णय घेतला आणि येथे तिहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले.
डॉ. अभिलाषा गावतुरे या सामाजीक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी भूमीपुत्र ब्रिगेड या नांवाने संघटना स्थापन केली आहे. कोरोणा काळात रूग्णांना मदत केली आहे. वाचनालयांना पुस्तके दिली आहेत. विविध सामाजीक कार्यात त्यांचा सहभाग आहे. त्या स्वत: कुणबी असून, त्यांचे पती माळी समाजाचे आहे. फुले—शाहू—आंबेडकर यांचे विचारांवर त्यांचे कार्य सुरू असल्यांने, त्यांनी उमेदवारी या बल्हारपूर क्षेत्रात गांभीर्याने घेतल्या जात आहे. त्यांनी प्रचारातही आघाडी घेतल्यांने, त्यांचे उमेदवारीमुळे बल्हारपूर मतदार संघात लढत रंगतदार झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!