नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
नवनियुक्त शिक्षकांचे सात दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण नवभारत कन्या विद्यालय मूल येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या प्रेरणेने पं. स. मूल गटशिक्षणाधिकारी सौ. वर्षा पिपरे यांचे मार्गदर्शनात दिनांक 04/11/2024 ते 11/11/2024 या कालावधीत सात दिवसाचे (50 तास) प्रशिक्षण पार पडले.
नवभारत कन्या विद्यालय, मूल येथिल प्रशिक्षणास राजकुमार हिवारे प्राचार्य, DIET, अश्विनी सोनवाणे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि. प. चंद्रपूर, व रवी तामगाळगे, अमोल बल्लावार विषय सहाय्यक यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देवून मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी कु. जयश्री गुज्जनवार, वासुदेव आत्राम, केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणात तीन मूल,सिंदेवाही, सावली या तालुक्यातील एकूण 60 नवनियुक्त शिक्षकांना सात दिवसाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुलभक तथा समन्वयक आनंद गोंगले, सचिन पुल्लावार, कु. बबिता चहांदे, रेवण मोहुर्ले विषय साधन व्यक्ती व गणेश आसेकर विषय शिक्षक यांनी सुलभकाचे कार्य केले. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर अर्जुनकर, सूत्रसंचालन विनायक कांडारकर व आभार प्रदर्शन मोहन माहोरकर या प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!