शिक्षकास व्हाट्सअँप चॅटिंग करणे पडले महागात
पवनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - वैनगंगा विद्यालय पवनी इथं शिकत असलेली विद्यार्थिनी ईला शिक्षकद्वारे व्हाट्सअँप मॅसेज करून त्रास देण्याचा जवळपास ८ दिवसा पासून चा विषय सुरु होता. परंतु या संदर्भात मुलींकडून कोणताच प्रतिसाद व उत्तर शिक्षकाला मिळाला नसल्यामुळे त्या शिक्षकांनी दुसऱ्या मुलींच्या मोबाईलशी संपर्क साधून तिच्या मैत्रीच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता. मॅसेज करणारे शिक्षक भोजराज दिघोरे वय ४५ वर्षे राहणार नेताजी वॉर्ड पवनी म्हणून अशी त्यांची वैनगंगा विद्यालयात ओळख होती. हे सर्व प्रकरण आई - वडिलांच्या कानापर्यंत किंवा घरापर्यंत गाजलेले दिसून आले. त्यानंतर वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिनी व तिचे पालक गुरुवारी सायंकाळी पवनी येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण प्रकार उघड सांगून तक्रार नोंद करण्यात आली. तक्रारीची संपूर्ण माहिती नोंदविण्यात आली त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय व सुरक्षितेच्या नुसार अप क्र. ३१३/२०२४ कलम ७८ (१) (ii), बि.एन. एस व सहकलम १२ पोक्सो लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण व त्या मुलीचे संरक्षण व्हावे म्हणून अधिनियम २०१२ अन्वये पोलीस स्टेशन पवनी यांनी दोषीवर गुन्हा दाखल करून त्या वर्ग शिक्षकाला अटक करण्यात आली. फिर्यादी विद्यार्थी हि १५ वर्षाची असून आरोपी शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतलेला असून पुढील तपास पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!