वरोरा, भद्रावती विधानसभा निवडणूकसाठी पक्ष व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल..




वरोरा.... जगदीश पेंदाम 

विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने काल आणि आज मोठ्या पक्ष उमेदवारांनी तसेच अपक्ष उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले. 
यामध्ये काल दि. २८ ऑक्टोबर ला अहतेशाम अली  प्रहार जनशक्ती पक्ष यांनी वरोरा शहरातून भव्य रॅली काडून मोठ्या प्रणात शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केले. मुकेश जिवतोडे यांनी (ऊ. बा. ठा.) गटाकडून  धनुजे कुणबी सभागृह येथून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केला. तसेच आज दि. २९ ला करण देवतळे यांनी भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या सोबत शक्ती प्रदर्शन करणात आले. या रॅली मध्ये हंसराज अहिर हे उपस्थित होते. अनिल धानोरकर यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडी यांचे कडून उमेदवारी अर्ज दाखल केला त्या वेळी त्यांनी सुद्धा मोठ्या प्रणात शक्ती प्रदर्शन केले. प्रवीण सुर यांनी मनसे तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. 
रमेश मेश्राम यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे  उमेदवार म्हणून  मोठ्या प्रणात शक्ती प्रदर्शन करीत आदिवासी वाद्य आणि नृत्य सदर करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तर्फे प्रवीण काकडे यांनी भव्य रॅली काढून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला त्या वेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, व रवींद्र शिंदे (ऊ. बा. ठा.) जिल्हाध्यक्ष हे हजर होते.सागर वरघणे यांनी बी. एस. पी. तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच ताराबाई काळे, डॉ. चेतन खुटेमाटे या सह काही अपक्ष उमेदवार यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले.
या संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया दरम्यान पोलीस प्रशासनाला मोठी तारेवरची कसरत करावी लागली असुन स्वतः उपस्थित राहुन  नयोमी साटम पोलीस उपनिरीक्षक कर्तव्य बचत होत्या त्यासाठी तालुक्यातील पत्रकारांना सुद्धा निवडणूक आयोगाच्या आवारात जाण्याकरीता प्रवेश नाकारण्यात आला होता....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!