बल्हारपूरच्या रिंगणात रासपची एन्ट्री — संजय कन्नावार यांची उमेदवारी दाखल

बल्हारपूरच्या रिंगणात रासपची एन्ट्री — संजय कन्नावार यांची उमेदवारी दाखल

मूल (प्रतिनिधी)

राष्ट्रिय समाज पक्षाने राज्यात महायुतीशी काडीमोड घेतल्यानंतर, या पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली.  बल्हारपूरमधून रासपचे विदर्भ विभागीय महासचिव संजय कन्नावार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बल्हारपूरच्या रिंगणात रासपची एन्ट्री झाली आहे.

धनगर आरक्षण हा प्रमुख मुद्दा घेवून रासपची देशभर वाटचाल चालू आहे.  संजय कन्नावार हे मागील अनेक वर्षापासून रासपचे अग्रणी नेते आहेत.  ते आता विधानसभेच्या रिंगणात असून, ते चांगली लढत देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आपण गरीब आणि सामान्याच्या हितासाठी संघर्ष करीत असून, या घटकांना न्याय देण्यासाठीच आपण मैदानात असल्यांचे त्यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले. बल्हारपूरातील रासपची एन्ट्री कोणत्या प्रस्थापित नेत्यांना घाम फोडते याकडे राजकीय जानकाराचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!