अज्ञान वाहनाच्या धडकेत एक ठार तर दोन गंभीर जखमी

जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे करण्यात केले दाखल

वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील घटना

जवळपास २ तास महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेदाम )
 
वरोरा : - वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द समोर लोनकर राईसमिल जवळ ०७:०० वाजताच्या सुमारास दुचाकीला अज्ञान वाहणाने धडक दिल्याने एक मुलगा जागीच ठार झाला तर दोघे जण जखमी आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरारो येथे दाखल करण्यात आले असून हिमांशू भाविक जुनारकर हा जागीच ठार झाला व आदर्श विजय तुराणकर, साईल श्रावण बावणे हे जखमी झाले आहे. सर्वजण चारगाव बुद्रुक येथील रहिवासी असून घटनास्थळी चिमूर उपनिरीक्षक राकेश जाधव तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश यादव, पोलीस कर्मचारी दाखल झाले आहे.परिसरातील शेकडो गावकरी यांनी मृत व्यक्ती व जखमीना नुकसान भरपाई  मिळनार नाही तोपर्यंत मृतकाचे प्रेत उचलण्यास नकार दिला आहे. वरोरा, शेगाव,चिमुर 353 ई राष्ट्रीय महामार्गाने किमान २ तासापासून महामार्गावर तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञान वाहन शंशयास्पद पकडले असून दोन आरोपीला शेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी तनावाचे वातावरण कायम असून बघ्यांची गर्दी व जमाव वाढतच चालला आहे. या अगोदर सुद्धा दुचाकी चालक मुलाला बस ने चिरडल्याची घटना घडली असल्याने दोषी महामार्ग आहे कि अज्ञात वाहन? याचा शोध जोमाने सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!