बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात उमेदवारांची ‘गर्दी’ ऐवढे झाले नामांकन

 बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात उमेदवारांची ‘गर्दी’ ऐवढे झाले नामांकन

राज्यातील विधानसभेच्या होवू घातलेल्या निवडणूकीकरीता बल्हारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून नामांकन दाखल करण्यांच्या अखरेच्या दिवशी तब्बल २० उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.  ही माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.

उमेदवारी दाखल करणारे उमेदवारांत, प्रकाश मुर्लीधर पाटील (अपक्ष), रब्बानी याकुब सयद (अपक्ष), संतोषसिंह चंदनसिंह रावत (भाराकॉ), उमेश राजेश्वर शेंडे (पिपल्स पार्टी आॅफ इंडिया), मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), संजय मारोतराव घाटे (अपक्ष), सत्यवान राघोजी कातकर (अपक्ष), गावतुरे छाया बंडू (अपक्ष), गावतुरे अनिता सुधाकर (अपक्ष), नरेंद्र शंकर सोनारकर (बहुजन समाज पार्टी), सचिन राजबहुरण रावत (अपक्ष), अभीलाषा राकेश गावतुरे (अपक्ष), राकेश नामदेवराव गावतुरे (अपक्ष), भारत सोमाजी थुलकर (आॅल इंडियन रिपब्लीकन पार्टी), संजय शंकर कन्नावार (राष्ट्रिय समाज पक्ष), सैयद अफजल अली (अपक्ष), संदिप अनिल गिर्हे (अपक्ष), विरेंद्र भिमराव कांबळे (अपक्ष)

उल्लेखनीय म्हणजे, कॉंग्रेसकडून उमेदवारीचा दावा करणारे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सोबतच त्यांचे पती डॉ. राकेश गावतुरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. डॉक्टर दाम्पत्यानी दाखल केलेले उमेदवारी अर्ज आज चर्चेचा विषय ठरले आहे.

संतोष रावत यांचे नामसदृष्य सचिन रावत हेही रिंगणात आहेत. संतोष रावत यांच्या मते खराब करण्याचा हा विरोधकाचा डाव असू शकतो महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा दावा करणारे, डॉ. संजय घाटे, प्रकाश पाटील मारकवार, संदीप गिर्हे, डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे संकेत दिले आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!