सावली वनपरिक्षेत्रात जनहितार्थ विविध उपक्रमाची सुरुवात

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर वनविभाग अंतर्गत येत असलेल्या सावली वनपरिक्षेत्रात सातत्याने जनहितार्थ विविध उपक्रम राबवल्या जातात.वन्यप्राणी वाघ, बिबट, अस्वल, रानटी डुक्कर यांचा फार मोठ्या प्रमाणावर वावर व अस्तित्व असल्याने बऱ्याचदा मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना जंगला सोबतच शेत शिवारात घडू लागलेल्या आहेत. मानव हव्यासापोटी दिवसेंदिवस अवैध अतिक्रमण करून वनजमीन कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यास वनक्षेत्र कमी पडत असल्याने वन्यप्राणी शेत शिवारात वावरत असल्याचे दैनंदिन निदर्शनास येत आहे. मानवी जीवन सुखमय राहण्यासाठी निसर्गाची जपणूक करणे काळाची गरज आहे. अन्यथा अन्नसाखळी विस्कटली जाईल, पर्यावरणाचा समतोल बिघडेल व पर्यायाने मानव जीवन आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन धोक्यात येईल. म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे संविधानिक कर्तव्य आहे.मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना सावली वनपरिक्षेत्रात नेहमी घडत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जंगलव्याप्त रस्त्यावर बरेचदा वन्यप्राणी राहत असल्याने त्यांच्याकडून मानवावर हल्ला होऊ नये व होणाऱ्या घटना टाळता याव्या, प्रवाशांना दुरूनच वन्यप्राणी दिसून यावा म्हणून रस्ते दुतर्फा स्वच्छता म्हणून साफसफाई केल्या जात आहे. तसेच सावली वनपरिक्षेत्रातील अतिसंवेदनशील गावाचे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून उपाययोजना केली जात आहे. वनविभागाशी संबंधित काहीही समस्या असल्यास गोरगरीब जनतेस याचा त्रास होऊ नये म्हणून व प्रत्येक संवेदनशील जंगल व्याप्त खेडोपाडी वन कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेद्वारे मदत केंद्र लावल्या जात असून प्रत्येक घरी भेट देऊन वन्य प्राण्यापासून सावधगिरी बाळगण्याबाबत सूचना देऊन सर्व समस्यांचे व मागण्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा उपक्रम प्रशांतजी खाडे विभागीय वनाधिकारी व विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात हा संपूर्ण उपक्रम राबवल्या जात आहे.  याद्वारे मानव आणि वन्यजीव संघर्षास आळा बसणार असून याकरिता स्थानिक गावकऱ्यांनी वनविभागास सहकार्य करणे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!