सावलीतील चिचबोडी गाव राज्यात चमकले - माझी वसुंधरा स्पर्धेत 50 लाखाचे पुरस्कार जाहीर

 सावलीतील चिचबोडी गाव राज्यात चमकले - माझी वसुंधरा स्पर्धेत 50 लाखाचे पुरस्कार जाहीर 

सावली : तालुक्यातील चिचबोडी गावाने राज्यस्तरीय स्पर्धेत माझी वसुंधरा या उपक्रमात गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम स्थान पटकाविले आहे. चिचबोडीचे सरपंच सतीश नंदगीरवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामस्थांच्या मदतीने गावाचे नाव राज्यस्तरावर नेले असून 50 लाखाचे पुरस्कार मिळणार आहे.

          चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिचबोडी २०७१ लोकसंख्येचे गाव आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पर्यावरण व वातावरणीय विभागामार्फत पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध स्तरावर  स्पर्धा घेण्यात आली. पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी माझी वसुंधरा अभियांन २०२३-२४ अंतर्गत चिचबोडी ग्रामपंचायतिकडून राबविण्यात आले. पर्यावरण व वातावरणीय विभागाचे वतीने पर्यावरण राखणाऱ्या ग्रामपंचायतची यादी नुकतीच घोषित करण्यात आली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चीचबोडी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला 50 लाख रुपयाचे पुरस्कार मिळणार आहे. या कामाला आ. विजय वडेट्टीवार यांचे योगदान लाभले असून, यासाठी उपसरपंच प्रतीक पेंदाम , श्यामराव बाबनवडे, गिरीधर काटवले, माधुरी कोरडे, नंदा बाबनवडे, प्रतिभा सहारे, उर्मिला रोहणकर, माधुरी चापले आदी सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र रायपुरे यांनी परिश्रम घेतले आहे. गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे मोलाचे मार्गदर्शन केल्याचे सरपंच सतीश नंदगीरवार यांनी सांगितले. 

   चिचबोडी ग्रामपंचायतीला यापूर्वी स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळालेला असून संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वछता अभियान स्पर्धेत जिल्हा स्तरावर पोहचलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!