शिक्षणाधिकाऱ्यांच्या दौऱ्यात पाथरीतील मुख्याध्यापक गायब - प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
शिक्षणाधिकाऱ्यांच्या दौऱ्यात पाथरीतील मुख्याध्यापक गायब - प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
पाथरी - तालुक्यातील पाथरी नगरी इंग्रज कालीन मध्यवर्ती ठिकाण असून येथे परिसरातील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा भागविन्यासाठी रोज ये - जा करतात या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालय असून पाथरी नगरीला तालुक्याचा दर्जा मिळावा या करिता अनेक वर्षांपासून पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती संघर्ष करीत आहे. पाथरीत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा असून 1 ते 10 वि पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असतात. परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून गत वर्षी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त झालेला आहे व जिल्हा परिषद हायस्कुल शाळा ही पी एम श्री मध्ये आलेली आहे व या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत परंतु या दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक यांचा कार्यकाळ बघता शाळेतील वातावरण खराब होत असल्याचे चित्र आहे त्या मूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच आज जिल्हा परिषद चंद्रपूर चे शिक्षणाधिकारी हे शाळा पाहणी संदर्भात दौरा केला असता जिल्हा परिषद हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री चौधरी हे अनुपस्थित होते व शिक्षणाधिकारी यांनी दस्तावेज तपासणी बाबतीत दस्तावेज मागितले असता या ठिकाणी आढळून आलेले नाही, जिल्हा परिषद हायस्कुल शाळा पी एम श्री मध्ये आलेली असून शाळेच्या विकासासाठी या ठिकाणी लाखो ने निधी येत असून मुख्याध्यापक यांच्या अनुपस्थिती मूळे यात काही घोळ तर नाही ना अशी शन्का निर्माण होत आहे, जर शिक्षणाधिकारी यांचा नियोजित दौरा असताना जबाबदार मुख्याध्यापक हेच गायब असतील तर शिक्षणाधिकारी यांनी शाळेतील कुठली पाहणी करावी अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. सुट्टीचा अर्ज नसतांना गैरहजर असल्यामुळे शिक्षणाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!