वाघाच्या हल्यात गुराखी ठार - सावली वनपरीक्षेत्रातील घटना


सावली : बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनपरीक्षेत्र अंतर्गत मुल तालुक्यातील मरेगांव येथील सर्व्हे नं. 111 च्या बाजुला असलेल्या गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी दरम्यान घडली. वासुदेव झिवरु पेंदोर वय 60 वर्षे रा. मरेगांव असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.

      घटनास्थळावर सावली वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी आपल्या ताप्यासह पोहचून पंचनामा केला असून शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मुल येथे पाठवले आहे. या महिन्यात तीन दिवसात मुल तालुक्यातील दुसरी घटना असल्याने जनता भयभीत झालेली आहे.

मुल तालुक्यात पंधरा दिवसात चिचाळा, जानाळा व मरेगाव येथे वाघाच्या हल्यात ठार झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!