चिमुर शहरात बुधवारला भव्य दहीहंडी स्पर्धा
चिमूर क्रांती क्रिडा व सांस्कृतिक समितीचे आयोजन
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर क्रांती क्रिडा व सांस्कृतीक समिती चिमूर व्दारा आयोजीत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्य चिमूर शहरातील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक. ०४ सप्टेंबर रोजी बुधवारला दुपारी ४.३० वाजता भव्य दहीहंडी उत्सव व स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार कार्यक्रमाचे उद्धघाटक गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, विशेष अतिथी चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिश वारजूकर, महासचिव प्रदेश महाराष्ट्र युवक काँग्रेस शिवाणी वडेट्टीवार, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी ( ओबीसी ) धनराज मुंगले, माजी जि.प.सदस्य गजानन बुटके, अध्यक्ष चिमूर तालूका काँग्रेस कमिटी डॉ.विजय पाटील गावंडे, प्रदेश महासचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस साहिश वारजूकर व आदींची मोठया प्रमाणावर उपस्थिती राहणार आहे.या दहीहंडी स्पर्धेमध्ये एक लाख रुपये रोख प्रथम पारितोषीक कमलाबाई नामदेव वडेट्टीवार यांचेकडून तर व्दितीय पारितोषीक एक्कावन हजार एक रुपये रोख, तृतीय पारितोषीक एकवीस हजार एक रुपये रोख हे धनराज मुंगले यांचेकडून विजेत्या संघास देण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक संदीप कावरे, गौतम पाटील, नागेंद्र चट्टे, अक्षय नागरीकर,इशांत मामीडवार, रोहन नन्नावरे, सारंग मामीडवार,अमित सातपुते, सुभाष मोहीनकर व समस्त मित्र परिवार यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!