चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी अश्विनी खोब्रागडे यांना द्या — प्रफुल्ल निमगडे यांची मागणी

 


चंद्रपूर विधानसभेसाठी कॉंग्रेसची उमेदवारी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या अश्विनी खोब्रागडे यांना द्यावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते प्रफुल्ल निमगडे यांनी केली आहे. 

देशात कॉंग्रेसचे वातावरण आहे.  राज्यात होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीतही कॉंग्रेस आघाडीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  त्यामुळे मागील अनेक वर्षापासून भाजपाकडे असलेला चंद्रपूर मतदार संघ, कॉंग्रेसला परत मिळवायचे असेल तर, अश्विनी खोब्रागडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री. निमगडे यांनी केली आहे.

अश्विनी खोब्रागडे या कॉंग्रेसच्या निष्ठावंत महिला नेत्या आहेत.  मागील अनेक वर्षापासून त्या विविध संघटनात्मक पदावर कार्य केलेल्या आहे.  चंद्रपूर​ जिल्हयातील  दलितांचे लोकनेते, बॅरीस्टर राजाभाउ खोब्रागडे यांचे कुटूंबातील त्या सदस्या असून, त्यांना उमेदवारी मिळाल्यास, चंद्रपूर जिल्हयातील आंबेडकरी समाज अश्विनी खोब्रागडे यांचे पाठीशी राहतील असा विश्वास श्री. निमगडे यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रपूर विधानसभेत कॉंग्रेसचा विजय होणार असल्यांने, अनेक बाहेरचे लोक वेळेवर येत उमेदवारीसाठी दावा करीत आहे.  केवळ पैशाच्या जोरावर कॉंग्रेसची उमेदवारी मागणार्यांना उमेदवारी देण्याऐवजी निष्ठावंत, जेष्ठ नेत्या आणि बॅरीस्टर राजाभाउ खोब्रागडे यांचे घराण्यातील अश्विनी खोब्रागडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री. निमगडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!