अंगावर भिंत कोसळ्याने महिलेचा मृत्यु

अंगावर भिंत कोसळ्याने महिलेचा मृत्यु
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील घटना 


नवरगांव:-
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील रहवासी रसिका देवराम मसराम वय 52 वर्ष ही सकाळी झोपुन उठल्यावर अंगनात झाडझुड करीत असतांना अचानक घरा शेजारील धुरपता वासुदेव मडावी यांचे घराची भिंत कोसळ्याने रसीका मसराम यांचा जागीच मृत्यू झाला यावर्षी रत्नापूर व परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे घराच्या भिंत कोसळण्याचे प्रमाणही जास्तच आहे परंतु दुसऱ्याची भिंत कोसळ्याने आजस्थीतीत अंगणातील रशीका मसराम यांचा दुदैवी मृत्यू आज  दि.1 सटेबर 24 सकाळी 6 वाजताचे दरम्यान झाला मोलमजुरी करुण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रशीका मसराम यांचा हा मृत्यु वेदनादायी आहे. या अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस ,तलाठी, पोलीस पाटील यांनी उपस्थीत राहुन पंचनामा केला आणि प्रेत पोस्टमार्डम करीता पाठवले आणि नंतर आजच रत्नापूर येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंतीम संस्कार करण्यात आले त्यांचे मृत्यु पश्चात दोन मुली, एक मुलगा ,नातवंड  असा बराच मोठा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!