जिल्ह्यात बोगस ड्रायव्हिंग स्कुलचा सूडसुडाट
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये वाहनावर 'ड्रायव्हिंग स्कुल' असे नाव लिहून काही वाहने प्रशिक्षण देताना दिसतात, यामुळे हिट अँड रन ' सारखी घटना घडल्यास याला जबाबदार कोन? बोगस वाहन सामोर दिसून सुद्धा सहा.मो.वा.निरिक्षक त्यांच्यावर कार्यवाही करीत का नाही? उलट तालुका R.T.O कॅम्प मध्ये बोगस वाहन चालवीणाऱ्यांना सहकार्य करतात असे वाहन कोणाचे आहे? परिवहन, विभागातील कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचे काही देणे-घेणे तर नाही? R.T.O विभागातर्फे तालुका स्तरावर स.मो.वा.निरिक्षक यांची ड्यूटी लावली असता त्यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली तेव्हा ते अधिकारी आमच्याकडे कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठाचा आदेश किंवा पत्र नाही असे म्हनतात. प्रत्येक कार्यवाहीसाठी वरिष्ठाचा आदेश किंवा पत्र लागत असेल तर ज्या वाहनावर कार्यवाही करतात त्यांचा आदेश यांना दिला असतो का? ही एक विचाराची बाब आहे. याबाबत सहा मो.वा.निरीक्षक यांना सांगितले असता ते फक्त. बघ्याची भुमिका घेतात कोणतीही कार्यवाही करीत नाही. परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याने भविष्यात यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो याची काळजी घेने गरजेचे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!