चिमूर जिल्हा परिषद उर्दु शाळेला शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी उर्दु शाळेच्या पालकांनी केली निवेदन देऊन मागणी
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२९ ऑगस्ट गुरुवारला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चिमूर यांना तालुका काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष आरीफभाई शेख यांच्या नेतृतवाखाली निवेदन सादर करण्यात आले.जिल्हा परिषद उर्दु शाळा हि चिमूर तालुक्यात एकमेव शाळा आहे. आणि ही उर्दु शाळा जवळपास १०५ वर्ष जुनी आहे.या शाळेतून शिक्षण घेऊन मुले नौकरीला लागले आहे.आणि आता या शाळेला शिक्षक मिळत नाही.या आगोदर अनेकदा निवेदन दिले. परंतु अजूनही शिक्षक मिळाले नाही.म्हणून आपण तात्काळ शिक्षकाची नेमणूक करावे असे निवेदन देण्यात आले.यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, खासदारांचे चे स्वीय.सहाय्यक राजु चौधरी, पप्पुभाई शेख, रिजवान पठाण, अफरोज पठाण, अनिस शेख आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!