वनविभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभेचे आयोजन - शेतकऱ्यांना सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन

सावली -  तालूक्यात वाढते हिंसक पशूंचे हल्ले, शेतीची नासधूस व इतर वनविभाग संबंधित प्रश्न लक्षात घेता राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे येत्या ०४/०९/२०२४ ला वनपरीक्षेत्र कार्यालय सावली येथे आढावा सभा घेणार आहेत. ज्या नागरिकांना अनुदान मिळाले नाही, ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे नुकसान झाले आहे त्या सर्वांनी प्रत्यक्ष हजर राहून आपली मागणी मांडावी व हिसंक पशुंची बंदोबस्त कसे करता येईल,या गंभीर समस्येबाबत या सभेत चर्चा करण्यात येणार आहे. करिता या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून  सहकार्य करण्याचे विनंती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!