अतिवृष्टीने घरांची पडझड झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत द्या - अभिजीत पावडे
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाले. तसेच शेगाव परिसरात सततधार पावसाने शेती पिकांची नुकसान झाले त्यातच शेगाव,अर्जुनी, वायगाव ,चारगाव, कोकेवाडा, धानोली, दादापूर, साखरा,आदी गावातील अनेक घरांची पडझड होऊन ग्रामीण जनतेचे नुकसान झाले. पावसाळ्यात राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक कुटुंबातील जनतेला पावसाळ्यात दिवसांमध्ये राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने ग्रामीण भागात तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी अभिजीत पावडे यांच्याकडून करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!