चक्क पालक मंत्र्यांच्या शुभेच्छा बॅनर मध्ये आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या फोटोची गैरहजेरी

जिल्ह्यात भाजप चे दोन गट सक्रिय झाल्याचे चित्र

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर शहरात मागील दिनांक.१९ जुलै २०२४ ला आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या वाढदिवसा निमित्त लावण्यात आलेल्या बॅनर ( होर्डिंग ) मध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुठेही फोटो टाकण्यात न आल्याने जिल्ह्यात भाजप च्या राजकारनात मोठ्या प्रमाणावर गटबाजी निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आहे. व सद्यास्थितीत बॅनरवरून राजकारणात दुरावा निर्माण करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात दिसू लागली असल्याने यामुळे सर्वत्र वातावरण चिघळले असून हाच प्रकार पुन्हा चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्रात दिनांक.३० जुलै २०२४ ला पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त ठिक - ठिकाणी लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर मध्ये दिसून आला यामध्ये आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांचे कुठेही फोटो नसल्याने चिमूर विधानसभा क्षेत्रात व जिल्ह्यात चांगलेच राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.या सर्व प्रकारामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काही वेगळे चित्र बघायला मिळतील अशाही चर्चा ठिक - ठिकाणी सूरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!