वंचित बहुजन आघाडीचे विविध विषयांवर एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न

उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.२६/०७/२०२४ ला वंचित बहुजन आघाडी चिमूरच्या वतीने जबराणजोत जमीन व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबियांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे या प्रमुख मागणीसह तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करावी , ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांचे आरक्षण वाढविण्यात यावे ,सर्व योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची उर्वरित निधी तात्काळ देण्यात यावी आणि निधीमध्ये वाढ करण्यात यावी, चिमूर तालुक्यातील तुकुम येथील बौद्ध समाजाला सामाजिक कार्याकरिता शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी , वाढीव विजदर कमी करण्यात यावा व शेतकऱ्याचे विज बिल माफ करण्यात यावे , बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्यावे , चिमूर व भिसी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा , विधवा घटस्पोटित निराधार महिलांना मिळणारा निधी तात्काळ देऊन त्यात वाढ करावी , तालुक्यातील महिलांच्या हातात काम मिळेल यासाठी तालुक्यात कुटीर उद्योग , लघु उद्योग यांची व्यवस्था करावी , वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना / शेतमजुरांना संरक्षण द्यावे तसेच वन्य प्राण्यांपासून जिवीतहानी व पिकांची हानी झाल्यास तात्काळ मदत करावी अशा एकूण २२ मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री, विदर्भ प्रमुख डॉ. रमेशकुमार गजभे, प्रमुख मार्गदर्शक मनून विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, जिल्हा अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे, युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकर, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेमलाल मेश्राम,नारायण कांबळे गुरुजी, एड.ज्ञानेश्वर नागदेवते, जिल्हाउपाध्यक्ष अश्विन मेश्राम,राजु अलोणे, महासचिव लालाजी मेश्राम,शहर अध्यक्ष शालिक थुल कोषाध्यक्ष जनार्धन खोब्रागडे, रवी शेंडे, विनोद सोरदे , मनोज राऊत, अमोल गझभिये,मिलिंद पाटील , शीतल सोरदे, सुरक्षा अंबादे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डाँ बाळासाहेब बन्सोड यांनी केले तर आभार प्रकाश मेश्राम यांनी केले.आंदोलनाच्या समाप्ती नंतर व उपविभागीय अधिकारी किशोर गाडगे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!