स्व.भाई रहेमतुल्ला यांचे स्मृती दीन प्रित्यर्थ अंगणवाडी कर्मचारी बचत गट प्रतिनीधी व कामगार मेळाव्याचे आयोजन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
   
चिमूर : - गरीबोंका दाता अशी ओळख असलेल्या अजातशत्रु, समाजवादी चे नेते गोर गरीबांचे कैवारी स्व.भाई रहेमतुल्ला यांचे २९ व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ अंगणवाडी कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी व कामगार मेळाव्याचे आयोजन चिमूर येथील शेतकरी भवन, हजारे पेट्रोल पंप समोर, २८ जुलै २०२४ रोजी रविवार सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्षा जि.प.भंडारा तथा कार्याध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) किसनाताई भानारकर , मुख्य अतिथी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार,सत्कामूर्ती गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान , प्रमुख पाहुणे माजी अध्यक्ष जि. प. चंद्रपूर डॉ. सतिश वारजूकर, माजी सरपंच ग्रा. प. नागभीड जहांगीर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ता लालाजी मेश्राम, सामाजीक कार्यकर्ता तळोधी (ना) शकील रहमेतुल्ला शेख आदी उपस्थित राहणार आहे.परिसरातील नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अंगणवाडी ताई व बचत गट प्रतिनिधीं सहभागी व्हावे असे आव्वाहन जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभाचे आवाहन इम्रान कुरेशी, माधुरी रमेश विर, प्रभा विश्वनाथ चामटक, रलता राजु देवगडे ललीता सोनुले विद्या वारजुकर , संयोगिता गेडाम अन्नपुर्णा हिरादेवे ,रोशनी चंदेल व तालुका बचत गट आहार पुरवठा संघटना यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!