चांदली बुज. येथे पाणीपुरवठा बंद - पिण्याचे पाण्यासाठी भटकंती

 चांदली बुज. येथे पाणीपुरवठा बंद - पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

@ विहीर पूर्ण न करता नळ देत ठेकेदाराचा उपराटा काम



सावली - चांदली बुज.येथे "हर घर नल, हर घर जल" अंतर्गत पाणी पुरविण्याच्या मिशनमध्ये नवीन योजनेच्या कामात पूर्वी मिळत असलेले पाणी कंत्राटदाराच्या नियोजना अभावी बंद झाल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वनवण करावी लागत  आहे. विहीर व टाकीचे काम न करता गावातील पाईपलाईन काढून अजबच काम कंत्राटदाराने केलेला आहे.

       तालुक्यातील चांदली बुज. येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे 1 कोटी 9 लाख रुपयाचे काम मंजूर झाले. कामाची यंत्रणा ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद असून सदर कामाचे कंत्राट पवार कंट्रक्शन यांचेकडे असून पुरवठा विहीर, उध्वनालिका, पम्पिंग हाऊस, वितरण व्यवस्था, स्विच रूम, नळ जोडणी ही कामे समाविष्ट आहेत. मागील वर्षी विहिरीचे काम अर्धवट करण्यात आले.  त्यानंतर पावसामुळे विहिरीचे काम बंद झाले. विहिरीचे काम अर्धवट असतांना गावातील वितरिका व नळ जोडणीचे काम करण्यात आले. काम करताना लहान पोकलन मशीनने खोदकाम न करता जेसीबीच्या सहाय्याने सिमेंट रोड पोडले यात यात सिमेंट रस्त्याची ऐसीतैसी तर झाली पण पूर्वीची पाईपलाईन पूर्ण उध्वस्त झाली . पूर्वी टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळत होते पण विहिरीचे व टाकीचे काम पूर्ण न करता गावातील पाईपलाईन तोडल्याने  मिळणारे पाणीसुद्धा बंद झालेले असून भर उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. यामुळे कंत्राटदाराविरुद्ध नागरिकांमध्ये रोष आहे.


विहिरीचे काम पूर्ण न करता गावातील काम सुरु केल्याने पाणी पुरवठा बंद आहे. अनेकदा ठेकेदाराला कळवूनही जुन्या पुरवठा योजनेच्या पाईपला जोडणी केलेली नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून यात ठेकेदाराचा अलगर्जीपणा आहे. 

श्री. विठ्ठल येगावार

सरपंच ग्रामपंचायत चांदली बुज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!