नेरी जांभुळघाट मार्गावरील रामपूर च्या जंगलात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

हत्या की आत्महत्या संशयास्पद मृत्य

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : -चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील टेकडीला लागून असलेल्या एका झाडला तेंदुपत्ता तोडणाऱ्या लोकांना आज दिनांक.०८/०५/२०२४ ला सकाळच्या सुमारास एक व्यक्ती फाशी लागलेला अवस्थेत आढळून आला त्यांनी लगचे पोलीसांना याबाबत ची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले .
फाशी लागलेला व्यक्ती हा चिमूर येथील रहीवासी असुन त्याचे नाव पुष्पराज पाटील असल्याची माहिती मिळाली असून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.तसेच पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!