भट्टीजांब येथे विजय वडेट्टीवार यांची भेट - गेडाम कुटुंबियांचे केले सांत्वन

  भट्टीजांब येथे विजय वडेट्टीवार यांची  भेट - गेडाम कुटुंबियांचे केले सांत्वन



सावली -  सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी स्व.राहुलदेव दौलतराव गेडाम यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.          

        घरातील कमावता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते या कठीण प्रसंगी विजय वडेट्टीवार व काँग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्ते यांनी गेडाम कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत सांत्वन केले आहे.

याप्रसंगी माजी जि.प.बांधकाम सभापती दिनेश चीटनुरवार, तालुकाध्यक्ष नितीन गोहने, सिंदेवाहीचे तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल, अनिल मशाखेत्रि, हरिदास मेश्राम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!