दोन कलई चोरटे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त

चिमूर तहसील ची कारवाई

मोठया चोरट्यांना तलाठ्यांचा आशिर्वाद तर छोट्या चोरट्यांवर कठोर कारवाई

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.०८/०५/२०२४ चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायावर धाडसत्र सुरु असून छोट्या चोरट्यांवर आणि छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशात चिमूर शहरातील मौजा खरकाडा येथील मधुकर कुंभारे यांच्या शेतजमिनीवर सर्वे क्रमांक.१३८ मध्ये दुपारी १२ वाजता च्या दरम्यान तलाठी प्रवीण ठोंबरे यांनी दोन ट्रॅक्टर पकडले त्यातील एक युरो कंपनीचा पावरटेक ट्रॅक्टर क्रमांक.MH 34 BF 6182 व दुसरा मेसी फर्गसन कंपनी चा ट्रॅक्टर क्रमांक.MH 34 BR 0922 कलई भरून वाहतूक करतांना पकडले तसेच जेसीबी क्रमांक.MH40 CT 0877 च्या चालकाने तलाठ्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने जेसीबी चालकावर तसेच ट्रॅक्टर चालक व मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे अशी चिमूर तहसील च्या माध्यमातून माहिती मिळाली आहे.परंतु चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती तसेच मुरूमाची चोरी माफिया करीत असतात त्यांच्या डोक्यावर राजकिय सत्ताधारी पक्षाचा आशिर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर चोरी सुरु असते तसेच शासकीय कामावरच हि चोरीची रेती आणि मुरूम टाकल्या जात असल्याने याबाबत ची माहिती तलाठ्यांना असून सुद्धा कारवाई केली जात नाही यास काय म्हणावे ? याबाबत अनेक तक्रारी आणि निवेदने देऊन सुद्धा कारवाई केली जात नाही.म्हणून एक म्हण आहे छोट्यांचा बघा वाकून आणि मोठ्यांचा ठेवा झाकून हि म्हण खोटी नसून सत्य ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!