ग्राम नवनिर्माणांसाठी ग्रामजयंती खेडोपाडी साजरी केली जावी - बंडोपंत बोढेकर



चंद्रपूर (प्रतिनिधी):-
गावातील प्रत्येक व्यक्तीस निरोगी, उद्योगी आणि सज्ञान बनविणे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती उद्योगी होणे हीच खरी सौंदर्य कला आहे .युवकांमध्ये श्रमनिष्ठेचा विचार रूजवणे,गावामध्ये परस्पर पूरक सहकार्याची भावना वृध्दींगत करणे आणि आपली ग्राम संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे मत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळ बोडगाव आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११५ व्या जयंतीच्या निमित्ताने भव्य ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन प्रार्थना मंदिर सभागृहापुढे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार समिती सदस्य ॲड.राजेंद्र जेनेकर होते. तर सरपंच भास्कर देवतळे,पोलिस पाटिल गोपिका परसुटकर,लटारू मत्ते गुरुजी,ॲड.सारिका जेनेकर, देवराव कोंडेकर,भजनप्रमुख बळीराम बोबडे,मोहन धोटे,सुवर्णा कावळे, मनोहर बोबडे,सौ.शुभांगी धोटे,राजेश वाटेकर,बाबुराव पहानपटे,चेतन जयपुलकर,अनील चौधरी,देविदास वांढरे,उत्तम अवघडे,शाखाप्रमुख रत्नाकर वडस्कर आदींची मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात राजुरा तालुक्यात टेंबुरवाही, नलफडी,वरुर रोड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा तसेच श्रीगुरुदेव मासिकाचे काम करणारे लटारु मत्ते,देविदास वांढरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सामुदायिक प्रार्थनेवर शैलेश कावळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन नरेंद्र चहारे आभार मयूर डोंगे सचिव यांनी केले.याप्रसंगी ॲड.राजेंद्र जेनेकर म्हणाले की , गावातील सज्जनशक्ती एकत्र येऊन ग्रामगीतेनुसार संघटन उभे राहिले पाहिजे जेणेकरून गावाच्या हितास्तव विविध कार्याला चालना देता येईल .
लटारू मत्ते गुरूजी यांनी राष्ट्रसंतांच्या विचारावर मार्गदर्शन केले तर ॲड.सारिका जेनेकर यांनी महिला सक्षमीकरण या संदर्भात महिलांना संबोधित केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता रामदास तुल्लूरवार,दिपक देवतळे,गौरव मोहुर्ले,शैला हनुमंते,ताईबाई सुर्तेकर,अंकित चोपडे,लक्ष्मण आसुटकर,गिरीधर पहानपटे,नितेन मोहुर्ले,अर्चना बोंडे,पवन चहारे,संगीता चोपडे, विपूल वडस्कर,आशा वडस्कर आदींनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!