वरोरा व शेगाव बू परिसरात सुगंधित तंबाखूची अवैध विक्री.... अन्न,औषधी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष..
वरोरा व शेगाव बू परिसरात सुगंधित तंबाखूची अवैध विक्री....
वरोरा..... जगदीश पेंदाम
राज्यात सुगंधित तंबाखू व गुटखा बंदी असूनही शहरात व खेड्या भागात काही किराणा दुकानातून अवैधरीत्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री जोरात सुरू आहे. संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून यावर आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे...
मध्ये प्रदेशातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची आवक होत असून यात लाखोंची उलाढाल होत आहे.राज्यात सुगंधित तंबाखू आणि गुटख्यावर बंदी घातल्यानंतरही ते मोठ्याप्रमाणात मिळत आहेत. पानठेले,किराणा दुकान,धाबे आणि इतर ठिकाणी छुप्या मार्गाने त्याची विक्री होत आहे.नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडू नयेत म्हणून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी घातली आहे. परंतु त्यानंतरही शेगाव, वरोरा येथील काही ठोक,चिल्लर किराणा दुकानदार त्याची विक्री करीत आहेत..
काही दुचाकी व चारचाकी वाहनातून सुगंधित तंबाखू व गुटख्याची घाऊक विक्री करताना दिसून येत आहे. तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात.या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा, तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केला जातो. तरुण पिढी जीवघेण्या आजारापासून वाचावी यासाठी शासनाने यावर बंदी घातली आहे. परंतू वरोरा व शेगाव बु परिसरात येथील काही ठोक व चिल्लर किराणा दुकानातून सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानातून तसेच टपरीवरून सुगंधित तंबाखू व गुटखाविक्री सुरू आहे. सुगंधित तंबाखू तसेच गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे.यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून, युवा पिढी गारद होत आहे. ही मोठी सामाजिक हानी आहे. शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. पोलिस प्रशासन तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर त्वरित अंकुश लावण्यात यावा.अशी मागणी तालुका परिसरातील नागरिकांकडून होत आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!