तेंदूपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला : महिला जागीच ठार

तेंदूपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला : महिला जागीच ठार

परीसरात दहशतीचे वातावरण

वन विभागाकडून  तातडीची 50,000 रुपयाची मदत


सिंदेवाही:-
तेंदूपत्ता संकलन करीत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला मजूर ठार झाल्याची घटना आज दिनांक 4/05/2024 रोजी शिवनी  वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 322 मधील पेटगाव खातेरा जंगल परीसरातील मौजा बामणी माल येथे  सकाळी 8.30 च्या दरम्यान घडली.
मौजा  बामणी माल  येथील दीपा दिलीप गेडाम वय 33 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठानेदार तुषार चव्हाण व चमू तसेच वन विभागाची टीम घटना स्थळी दाखल होऊन परीसरात मोठ्या प्रमानात जमलेल्या जमावाची संयमाने सुव्यवस्था कायम राहावी यासाठी समजूत काढून वन विभागाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच प्रेत तात्काळ उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले . सदर परीसरात कायदा ल सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा ठेवून बंदोबस्त लावण्यात आला असल्याने परीसरात शांतता आहे.


या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
*वन विभागाकडून तातडीची 50,000 रु.मदत*
तातडीची मदत म्हणून वन विभागाने  50000/-रुपये मृतकाच्या पतीला दिले
मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट
क्षेत्रसहाय्यक  एस. वाय. बुले
क्षेत्र सहाय्यक नल्लेश्वर पेंदोर
क्षेत्र सहायक शिवनी  प्रधान
वन रक्षक  मडावी ,  कोवे,  शेख,भारत मडावी , सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर पि आर टी सदस्य हजर होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!