मिनाताई विद्यालय नवखळा चा सफल निकूरे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र




 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा- 2024 इयत्ता 5 वी परीक्षेमध्ये नागभीड तालुक्यातील नवखळा येथील मिनाताई माध्यमिक विद्यालयातील सफल संतोष निकूरे हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरला आहे.
          सफल ला 298 गुणापैकी 208 गुण मिळाले असून त्याच्या गुणांची टक्केवारी 69.79 आहे.
            एका ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्याने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र शाळेत तसेच गावात कौतुक केले जात आहे.शाळेत चालणारे नियमित शिष्यवृत्ती तथा स्पर्धा परीक्षेचे अतिरिक्त मार्गदर्शन तसेच शिष्यवृत्ती चे सराव पेपर यामुळे हे यश मिळाले..* 
         *सफल ने आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक श्री.रवि जांभुळे सर,गणित शिक्षिका निकूरे मॅडम,देशकर सर, घ्यार सर तसेच पालकांना दिले.* 
           *सफल ने मिळविलेल्या या यशा बद्दल संस्था सचिव श्री. योगेशराव गोन्नाडे,मुख्याध्यापक श्री,प्रबुद्ध गेडाम सर सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!