मतदानापर्यंत पाणी सुरु... मतदान होताच पाणीपुरवठा बंद... @ टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विजच कापले
मतदानापर्यंत पाणी सुरु... मतदान होताच पाणीपुरवठा बंद...
@ टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विजच कापले
सावली : निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बंद असलेली पाणीपुरवठा योजना अचानक सुरु झाली. मतदान आटोपले आणी पुन्हा पाणी पुरवठा योजनेचे विजच कापल्या गेल्याने आणखी पाण्यासाठी भटकंंतीची वेळ नागरिकांवर आली. हा प्रकार टेकाडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा असून मतांसाठी ही योजना आहे का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
वैनगंगा नदीवरील हरणघाट येथून टेकाडी ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा केला जातो. येथिल पाणी कवठी, पारडी, रुद्रापूर, चांदापुर, खेडी, चांदली बूज, टेकाडी या गावांना पुरविल्या जाते. मागील एक वर्षांपासून चालू बंद स्थितीत या योजनेचा पाणी पुरवठा होत असतो. त्यातही कनेक्शन घेतलेल्या कुटुंबांना पूर्वीच पाणी पोहचत नसताना " हर घर नल, हर घर जल" अभियानंतर्गत प्रत्येकाला नळ होते. पण त्या नळाला पाणी पोहचविण्याची जबाबदारी शासनाने न घेता प्रत्येक घरी नळ दिल्याचा गाजावाजा करीत पाठ थोपटून घेतली. या योजनेचा पाणीपुरवठा बंद होता मात्र निवडनुकीची चाहूल लागताच पाणी पुरवठा सुरु झाला. कारण "हर घर जल" ची भाजपच्या जाहिरातीवर टिका होऊन मत विरोधात जाऊ नये ही खेळी असेल. मतदान आटोपले मतदारांची गरज संपली म्हणून पाणी पुरवठा योजनेचे विजेचे कनेक्शनच थकीत बिलासाठी महावितरण ने कापले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद आहे. आता येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. याकडे पालकमंत्री लक्ष देतील का? असा प्रश्न जनता करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!