भाजप प्रणित रेती माफियांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
चिमूर तालुक्यातील घटना
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची जिल्ह्यात धडक कारवाई सुरू
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. २८/०४/२०२४ ला सकाळी ०६:३० ते ०८:०० वाजताच्या दरम्यान चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर असलेल्या वहानगाव ते बोथली या गावाच्या मधोमध अवैधरित्या रेती वाहतूक करतांना ३ ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने पकडून शेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करून कारवाई केली. यावेळी पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले,पोहवा स्वमिदास चालेकार,चंदू नागरे,अजय बगेसर, प्रशांत नागोसे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी हि मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.या प्रकरणातील आरोपी ट्रॅक्टर चालक (१) सौरभ दत्तू दडमल राहणार खडसंगी , (२) मनोज रमेश वानखेडे राहणार शेडेगाव , (३) बंडू बापूराव चौधरी राहणार खडसंगी , असून या ट्रॅक्टर चे आरोपी मालक (१) अनिल ज्ञानेश्वर मेश्राम राहणार खडसंगी , (२) सचिन ज्ञानेश्वर मेश्राम राहणार खडसंगी हे दोघेही सख्खे भाऊ असून भाजप प्रणित आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी च्या अगदी जवळचे आहे. या अगोदर यांच्याच ट्रॅक्टर ने FDCM खडसंगी च्या जंगल परिसरात अवैधरित्या रेती वाहतूक करतांनाच खडसंगी लगत असलेल्या पुनर्वसन नवेगाव येथील मजुराचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी आहे व याबाबत चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.असे असतांना देखील या माफियांना महसूल व पोलीस विभागाची भीती न बाळगता सर्रासपणे हा व्यवसाय सुरु आहे. जिल्ह्यामध्ये कुठेही रेतीघाट लिलाव झालेली नसल्याने या रेती विक्री च्या व्यवसायात जिल्ह्यात तथा बाहेर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त दरात रेतीची मागणी आहे. हा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असंख्य माफियांनी या व्यवसायाला चालना देत व्यवसाय सुरू केला आहे.यांच्या ट्रॅक्टरच्या फाटक्या सायलेन्सर च्या कर्कश अशा आवाजाने महामार्गालगत राहणाऱ्या लोकांची रात्रीची झोप उडाली असून याबाबत अनेक निवेदने तसेच तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर देण्यात आली आहे. या व्यवसायाने माफियांची दादागिरी वाढतच चालली असून चिमूर येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी माजी सैनिक तथा वनरक्षक यांना कर्तव्यावर असतांना मारहाण करणारे हे शासकीय कर्मचारी आणि आमदारांच्या अगदी जवळचे भाजप चे कार्यकर्तेच होते. व या रेती माफियांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली हि सुद्धा घटना अगदी ताजीच आहे.आणि आरोपी हा राजाश्रय असल्याने सर्रासपणे सुसाट मोकाट फिरत असल्याने वनरक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु याकडे वन व महसूल विभागाने पाठ फिरविली असे चित्र या कारवाईनंतर दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!