वलनी चौरास च्या सरपंचा सौ. वत्सला विकास तिघरे पुन्हा सरपंच पदावर कार्यरत
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - मौजा वलनी चौरास च्या सरपंचा सौ.वत्सला विकास तिघरे सरपंच पुन्हा पदावर कार्यरत झाल्या असून मा.अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या १८/०४/२०२४ च्या आदेशानुसार वलनी चौरास येथील सरपंचा सौ. वत्सला विकास तिघरे यांनी सरपंच पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आणि मा. जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांचेकडे हे प्रकरण फेर सुनावणी करिता परत पाठविण्यात आले आहे.अतिक्रमनाच्या वादामुळे सरपंच वच्छलाताई तिघरे यांना अगोदर त्यांच्या पदाचा कार्यभार काढण्यात आलेला होता परंतु त्यांनी योग्य न्याय मिळावा म्हणून विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे अपील करून न्याय प्राप्त केला व पुनरावृत्ती वलनी ग्राम पंचायत चा कार्यभार सांभाळण्यासाठी मी स्वतः सक्षम आहे असे जनतेला दाखवून दिले व ज्यांनी जे त्यांच्या वर आरोप केले होते ते त्यांनी फेटाळून लावले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!