जि.प.डिजिटल पब्लिक स्कूल पवनी येथे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - २७/०४/२०२४ स्थानिक जि.प.डिजिटल पब्लिक स्कूल मधील डिजिटल क्लासरूमचे पवनी येथील वैनगंगा विद्यालयाच्या प्राचार्या सुजाता अवचार तथा गट समन्वयक दिपाली बोरीकर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. शाळेला पंचायत समिती पवनी कडून स्मार्ट इंटर ऍक्टिव्ह बोर्ड देण्यात आला.प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहता यावे यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणे गरजेचे झालेले आहे. जुन्या पारंपारिक अध्यापन पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना विद्यार्थी सामोरे जाताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये आणि त्यांना सुलभतेने शिक्षण मिळावं म्हणून तंत्रज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे,असे मनोगत प्राचार्या श्रीमतीअवचार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.कार्यक्रमाला वैनगंगा विद्यालयाच्या शिक्षिका सिमा कावळे, प्राध्यापक योगेश ढेंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक संदीप समर्थ, उपाध्यक्ष वसीम शेख तसेच यजुवेंद्र घोरमोडे, भगवान रामटेके सुप्रिया गुट्टे,रोशनी शेंडे,विशेष शिक्षक महेंद्र भुरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाली मोटघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका केशर गणवीर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व शाळेतील शिक्षिका वर्षा गणवीर,रिता चव्हाण,परविन सय्यद,वैशाली मसराम तसेच स्वीटी मेश्राम यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!