जि.प.उ.प्रा.शाळा.सावरी (बिड) शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न
या चला!शाळेत पहिल्यांदाच जाणाऱ्या आपल्या मुलांची तयारी आपण मिळून करू या
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - शासनाकडून मार्च - मे, २०२२ मध्ये शाळापूर्व तयारी मेळावा' आयोजित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.त्यापूर्वी कोरोनाचा काळ होता. शाळा बंद असल्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला होता. मुलांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नव्हता. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी. होणे फार आवश्यक होते, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील.या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक यांची मुख्य भूमिका असते. जि.प.उ.प्रा.शाळा सावरी (बिड) शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा इयत्ता १ली २०२४-२५ सत्र या शाळापूर्व मेळाव्याचे उद्घाटक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.मंगलाताई घानोडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गुणवंत नवले, तसेच प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विठ्ठल घुमे, प्रदीप वाकडे, सौ.सविता सावरकर,सौ.प्रिया हिवज,सौ.पोर्णिमा रामटेके,सौ.सुरेखा शेंबेकर आदी सदस्य गण उपस्थित होते.
शाळा पूर्व मेळावा मार्गदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलाताई घानोडे यांनी केले.यावर्षी सावरी (बिड)शाळेत १७ विद्यार्थी दाखलपात्र झाली. यावेळी एस.सी.चौधरी सर ,व्ही.बी सावसाकडे सर,पी.एच.आत्राम सर,राजेश मेश्राम सर यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन करून मोबाईल व दूरदर्शन पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवणे आवश्यक आहे,असे सांगितले.शाळा पूर्व मेळावा प्रास्ताविक पी.व्ही.कुरेकार मॅडम यांनी केले.सौ.एस.डी घोरुडे मॅडम यांनी आभार मानले. या प्रसगी यशवंत शास्त्रकार शिक्षणप्रमी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!