दिपक आत्राम माजी आमदार यांनी केलें राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर येते निवड झाल्याबद्दल कु.धनिराम झुरी याच्या सत्कार




स्व.श्री.मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्था तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा सलग्नित स्व.श्री.मल्लाजी आत्राम कला महाविद्यालय जारावंडी येथील कु. धनिराम केये झूरी याची निवड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरात निवड झाली आहे. हा विद्यार्थी अतिदुर्गम आदिवासी भागातला विद्यार्थी आहे. त्याचा समाजसेवेची आवड बघता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली राष्ट्रीय सेवा योजना विभागाने त्याची निवड केली आहे.स्व.श्री. मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भारत राष्ट्र समितीचे नेते, माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष आविस मा. दिपक दादा आत्राम यांनी त्याचा महाविद्यालयात उपस्थित राहून त्याचा सन्मान केला.तसेच विद्यार्थांनी भविष्यात प्रगती करावी अशी अपेक्षा मा.दिपक दादा आत्राम माजी आमदार यांनी केली.तसेच संस्थेचे सचिव मा. अनिता आलाम , गोंडवाना विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे, स्व.श्री.मल्लाजी आत्राम कला महाविद्यालय जारावंडी चे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश बसवेश्वर हजारे, उमेश मोहूर्ले, सुधाकर ठेकाम, रमेश दुग्गा,जुलेख शेख, विनोद कावेरी श्रीकांत चीप्पावर, मिलिंद मोहुर्ले अजय शडमेक, ज्ञानेश्वर चौधरी इत्यादी उपस्थित राहून त्याचा सत्कार केला.त्याचा निवडीबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्याचा निवड झाल्याबद्दल त्याचे महाविद्यालया तर्फे सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!