दिव्यांग विदयार्थीना साहित्य वाटप
दिव्यांग विदयार्थीना साहित्य वाटप
समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमा अंतर्गत, दिव्यांग विद्यार्थी यांना गट साधन केंद्र, पंचायत समिती, मुल येथे साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्री गुज्जनवार विस्तार शिक्षण अधिकारी, प्रमुख पाहुणे श्री दयाराम भाकरे केंद्र प्रमुख सुशी, श्री सुनील गेडाम केंद्र प्रमुख टेकडी, श्री वासुदेव आत्राम केंद्र प्रमुख चिखली, श्री सतिश राजुरवार जेष्ठ पत्रकार मुल उपस्थित होते.
दिव्यांग विदयार्थीना गतिशीलतेतील मर्यादा कमी करण्यासाठी व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पणे ये - जा करता यावा तसेच शाळेत सामान्य विदयार्थीन सोबत समायोजन करून अध्ययन अध्यापनातील व सामाजिक अंतर क्रियेतील मर्यादा कमी करून समता प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश आहे.या करीता समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमा द्वारे व्हिल चेअर, रो - लेटर, श्रवण यंत्र, ट्रायसिकल, सी पी चेअर, कमोड चेअर चे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी साहित्याचा महत्त्व व वापर कसा करयचा ,काळजी कशी घ्यावी,या संदर्भात उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ईश्वर लोनबले विशेष शिक्षक, प्रास्ताविक श्री संतोष सोनवणे समा. तज्ञ तर यासाठी श्री विवेक डांगे समा. तज्ञ, श्री यशवंत शेट्टे श्री निलेश शेणमारे, श्री स्वप्निल मेश्राम विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!