कलकत्ताच्या प्राध्यापिकेचे फेसबुकवर जुळले प्रेम आणि मूल शहरात येवून...!

कलकत्ताच्या प्राध्यापिकेचे फेसबुकवरून जुळले प्रेम आणि मूल शहरात येवून...! Love on Facebook 
पन्नाशीतील 'त्या' दोघांच्या प्रेमाचा सुखद शेवट!


तीन वर्षापूर्वी कलकत्ता येथील प्राध्यापिका असलेल्या सुमीता, वय 45 वर्ष (नांव बदलविले आहे) चे मूल येथील अहमद वय 47 वर्ष(नांव बदलविले आहे) सोबत फेसबुक फ्रेंडशिप झाली! या फ्रेंडशिपचे रूंपातरण हळू—हळू मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांना भेटण्यास आतुर झालेत! फेसबुकच्या मॅसेंजरवरच लग्नाच्या आना—भाका झाल्यात. तीने याला लग्नाची गळ घातली, यानेही 'हो' म्हणत, तीच्या आशा पल्लवीत केल्यात. कलकत्ता वरून ती कशाला मूल सारख्या आडवळणाच्या गावात येईल? याच भ्रमात अहमद असतांनाच, एके दिवशी त्याच्या घरासमोर थेट सुमीता पोहचली, सुमीतांने अहमदला "शादी करने के लिये आयी हूॅ! असे म्हणताच, अहमद, त्याची मुलगी आणि जावई यांचेसमोर दिवसाच तारे दिसायला लागले. 
कलकत्ता ते नागपूर, नागपूर ते चंद्रपूर आणि चंद्रपूर ते मूल असा प्रवास करीत सुमीता अहमदच्या घरी आली. मात्र अहमदची मुलगी आणि अहमद लग्नाला नकार देत, सुमीताला हकलून लावण्यांचा प्रयत्न केला. सुमीतांने मात्र हार न मानता अहमदच्या वार्डातील नगरसेवकांकडे दाद मागीतली. प्रकरण गंभीर असल्यांने नगरसेवकांनी तीला पोलिस स्टेशनला जाण्यांचा सल्ला दिला. मूलचे कुणीही तीला साथ न दिल्यांने अखेर तीने अहमद आणि त्याचे मुलीच्या विरोधात पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली. तक्रारीत तीने 
"माझेशी लग्न करण्याचे आमीश दाखवून माझा मानसीक छळ केला, माझे शरीराशी छेडछाड केली, माझ्या मनाशी, माझे आर्थिक नुकसान केले. जाणून बुजून माझ्या मनाशी छेडछाड केली. व मला जिवे मारण्याची धमकी दिली. असून गैरअर्जदारापासून मला धोका निर्माण झालेला आहे."
असा आरोप करीत, थेट कारवाईची मागणी केली. अहमदने सुमीताला फेसबुक, मॅसेंजर, व्हाटसअपवर केलेले संदेश, फोटो दाखवित, पोलिस स्टेशनमध्येही अहमदसोबत लग्नाचा हेका कायम ठेवला. अखेर आपसी तडजोड करीत, अहमदनी सुमीतासोबत लग्न करीत, तीचे सोबत कलकत्ताला रवाना झाला.
अहमदला मोठी मुलगी असून, त्याची पत्नी मरण पावल्यानंतर तो मुलगी—जावई यांचेकडे राहत होता.
आपल्या सासऱ्याचा प्रताप जावयाला मात्र आवडला नाही. त्याला हे लग्न मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणाे  सासर्‍याला घरी ठेवण्यास नकार देत  नव्या सासू सोबत दिल्या घरी सुखी रहा म्हणत कलकत्त्याला रवानगी दिली
 आपला एकाकीपणा घालविण्यांकरीता फेसबुकचा वापर करीत असतांना सुमीतासोबत झालेली फेसबुक मैत्री त्याला कलकत्ता येथे घेवून गेली.
#Facebook #Masanger #Whatsapp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!